Type Here to Get Search Results !

पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून, पंतप्रधानांनी...; संजय राऊतांनी केली 'ही' मागणी

मुंबईः केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केलं आहे. तर, आता शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी ही मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी () मदत करावी, असं म्हटलं आहे. 'कृषी कायद्याविरोधात रस्त्यापासून संसदेपर्यंत आंदोलन झालं. सरकार ऐकायला तयार नव्हतं. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकार झुकलं. या आंदोलनात शेतकरी मृत्यू झाले. ७०० हून अधिक शेतकरी दगावले. आता जर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होत असेल तर त्यात चूक काय आहे?,' असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 'पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडले आहेत. त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी. देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागून चालणार नाही. त्यासाठी मदत करा. तुम्ही जी चुकी केली त्याचं नुकसान ७०० कुटुंबांना भोगावं लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे. मला खात्री आहे पंतप्रधान सह्रदयी आहेत ते मदत करतील,' असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. 'मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारत आहे. त्यांच्याशी काल रात्री बोलणं झालं. लवकरच ते घरी जातील. त्यांनी संपूर्ण बरे होऊन कामाला लागावं. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नये. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कामाला सुरुवात करावी,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 'एसटी कामगारांच्या संपावरही त्यांनी भाष्य केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे प्रयत्न सुरू आहेत ते दिवसरात्र बैठका घेत आहेत. काही संघटना आणि राजकीय पक्ष आठमुठेपणाने वागत असतील तर त्यातून अडथळे निर्माण होतात,' अशी टीका त्यांनी केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30MF0pH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.