Type Here to Get Search Results !

अजित दादांसोबतचा कार्यक्रम अण्णा हजारेंनी टाळला; 'हे' आहे कारण

अहमदनगर: उपमुख्यमंत्री ()आणि राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज शनिवारी होत असलेल्या पारनेर तालुक्यातील कार्यक्रमास उपस्थित राहणे ज्येष्ठ समाजसेवक () यांनी टाळले आहे. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराजांचा अभंग गाथा प्रकाशन सोहळा व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार असा हा धार्मिक कार्यक्रम आहे. तरीही तो ठरावीक पक्षाच्या राजकीय लोकांच्या उपस्थित तो होत असल्याने हजारे यांनी तेथे उपस्थित राहणे टाळले असल्याचे सांगण्यात येते. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. उपमुख्यमंत्री पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. पिंपळनेर देवस्थानशी हजारे यांचे निकटचे संबंध आहे. तेथील अनेक धार्मिक कार्यक्रमांना हजारे उपस्थित असतात. ही संधी साधून राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत हजारे यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे या कार्यक्रमाचे हजारे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. वाचाः प्रत्यक्षात मात्र हजारे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मंत्री आणि पदाधिकारी कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. पारनेरचे आमदार आणि अल्पावधीतच पवारांचे निकटवर्तीय बनलेले नीलेश लंके या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेपर्यंत हजारे यांची मनधरणी करून त्यांना पिंपळनेरला घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, हजारे आपल्या नकारावर ठाम होते. कार्यक्रम धार्मिक असला तरी विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थित होत आहे. त्यांच्यासोबत कार्यक्रमास उपस्थित राहणे योग्य ठरणार नसल्याचे हजारे यांनी संबंथित पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सांगितल्याचे कळते. शेवटी हजारे येत नसल्याचे पाहून ठरल्यावेळी कार्यक्रम सुरू होत आहे. वाचाः हजारे यांनी पवार यांच्यासह अन्य नेत्यांसंबंधी राज्य सहकारी बँक आणि साखर कारखाने विक्री प्रकरणी आरोप केलेले आहेत. तर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हजारे यांना टाळण्याचीच भूमिका यापूर्वी घेतल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर हजारे या कार्यक्रमास उपस्थित राहणार का? अशी शंका कार्यक्रम जाहीर झाल्यापासून व्यक्त केली जात होती. मात्र, आमदार लंके यांच्याशी हजारे यांचे चांगले संबंध आहेत. लंके यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून अनेकदा हजारे यांनी त्यांचे कौतूकह केलेले आहे. त्यामुळे लंके यांच्या अग्रहास्तव हजारे उपस्थित राहू शकतात, असा अंदाज काही जणांकडून व्यक्त होत होता. मात्र, अखेर हजारे यांनी कार्यक्रम टाळून लंके वगळता इतरांसबंधीच्या आपल्या भूमिकेत बदल झाला नसल्याचेच दाखवून दिल्याचे स्पष्ट होते. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DCzXqj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.