Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न कोण करतंय?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

अमरावतीः 'त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यांची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आली. याद्वारे देशभरात समाजाला भडकवण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात. हे नियोजीत मोर्चे होते. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले यांची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची यापाठीमागची भूमिका काय होती. महाराष्ट्रात आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे,' अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. १२ व १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यात अनेक व्यवसायिकांच्या दुकानांची तोडफोड सुद्धा झाली होती. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावती शहरातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याच घटनेचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले आहेत. व्यापाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. '१२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये मोर्चा निघाला. या मोर्चाला काय विचार करुन परवानगी देण्यात आली याचीही चौकशी झाली पाहिजे. या मोर्चाच्या नंतर समाजकंटकांनी ज्याप्रकारे दुकाने आणि लोकांना लक्ष्य केले. यातून दंगल घडवायची होती म्हणून एका विशिष्ट समाजाच्या आणि धर्माच्या दुकानांवर हल्ला करण्यात आला. त्यातून अमरावतीची परिस्थिती बिघडली,' असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30MJkFr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.