Type Here to Get Search Results !

फेसबुकवरून फोटो डाऊनलोड करून तयार केली अश्लील व्हिडिओ क्लिप, नंतर आरोपीने केलं भयंकर कृत्य

कोल्हापूर : पत्नीचे फोटो अश्लील पॉन व्हिडीओसोबत एडिट करुन ते सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देऊन मोबाईल कंपनीतील एका कर्मचाऱ्याकडून ४५ हजार रुपये उकळल्याची घटना घडली आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. राजारामपुरी पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. गुन्ह्यातील फिर्यादी हा मोबाईल कंपनीच्या फायबर ऑप्टिकलमध्ये नोकरीस आहे. फिर्यादी व त्याच्या पत्नीचे फेसबुकवर अकाऊंट आहे. फिर्यादीला गुन्ह्यातील संशयित राहूल यादव याचा फोन आला. आमच्याकडे सेक्स करण्यासाठी महिला असून तुम्हाला हवी असतील तर कळवा. तसेच राहूल यादव याने काही महिलांचे फोटोही फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवले. त्यानंतर राहूल याने फिर्यादीला फोन करुन तुम्हाला आवडलेली मुलगी बूक केली असून हॉटेलही बुक केल्याचे सांगितले. यावर फिर्यादीने मी कोणतीही मुलगी बुक केलेली नाही असे सांगितले. त्यावर संशयित राहूल चव्हाण याने तुमच्यासाठी मुलगी आणि हॉटेल बूक केली असून हॉटेलचे १५ हजार रुपये भाडे देण्याची मागणी केली. तसेच पैसे जमा करण्यासाठी पेटीएमचा नंबरही दिला. फिर्यादीने हॉटेलचे भाडे देण्यास नकार दिल्यावर संशयित चव्हाण याने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मिडियावरुन अपलोड करुन त्याला पॉर्न अश्लिल फिल्म जोडून एडिट केली. एडिट केलेली पॉर्न अश्लील व्हिडिओ संशयित राहूल यादव याने फिर्यादीच्या व्हॉटस् अॅपवर पाठवली. तसेच अश्लील व्हिडिओ फिल्म व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पेटीएमचा क्यू आर कोडही पैसे ऑनलाईन जमा करण्यासाठी मोबाईलवर पाठवला. पत्नीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करेल या भितीने आणि संशयिताच्या धमकीला घाबरुन फिर्यादीने ऑनलाईनवर वेळोवेळी ४५ हजार रुपये संशयित राहूल यादवच्या अकाऊंटवर जमा केले. संशयिताने पैशाचा तगादा जास्त लावल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qEF2uI

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.