Type Here to Get Search Results !

'तो' अधिकार आपल्याला नाही; यशोमती ठाकूर यांनी साधला विक्रम गोखलेंवर निशाणा

मुंबईः ‘देशाला कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळालेले नाही, तर ते भीक मागून मिळाले आहे,’ असे विधान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले () यांनी केले. तसंच, विक्रम गोखले यांनी कंगना राणावतच्या () विधानाचे समर्थनही केले होते. विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटायला सुरुवात झाली आहे. विक्रम गोखलेंच्या या वक्तव्यावरुन नवीन वाद उभा राहिला आहे. राजकीय वर्तुळातही त्याचे पडसाद उमटायला लागले आहेत. काँग्रेस नेत्या व महिला व बालकल्याण मंत्री यांनी विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केलं आहे. वाचाः यशोमती ठाकूर यांनी काही वेळापूर्वी एक ट्वीट केलं आहे. 'विक्रम जी, आपल्या वयाचा आदर आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा आधिकार आपल्याला नाही. आपली भक्ती एखाद्या नेत्यावर- पक्षावर असून शकते, पण हा देश, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान त्यापेक्षा कैकपटीने मोठं आहे. आपल्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच आहे,' असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. विक्रम गोखले काय म्हणाले होते? बोलली ते खरे आहे. मी तिच्या मताशी सहमत आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिक फाशी जाताना देशातील मोठ मोठे लोक बघत राहिले. त्यांना कोणी वाचवले नाही. ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या लोकांना वाचवले पाहिजे होते, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे. वाचाः भाजप व शिवसेनेने एकत्र यावे भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद दिले असते, तर काय बिघडले असते, असा सवाल विक्रम गोखले यांनी केला. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले नाही, ही आमची चूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यापाशी मान्य केले आहे. चुकलेले गणित सुधारण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या कडेवर असताना भाजप आणि सेनेने एकत्र आले पाहिजे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. बाळासाहेबांमुळे मराठी माणसाला आधार वाटला. आज त्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील. मराठी माणूस भरडला जात आहे. लोक अस्वस्थ आहेत, असे गोखले म्हणाले. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HqDMB2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.