Type Here to Get Search Results !

बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहताना लतादीदी भावुक; म्हणाल्या...

मुंबई: शिवशाहीर (Babasaheb Purandare) यांच्या निधनाबद्दल राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. गानकोकिळा 'भारतरत्न' () यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मला अत्यंत धक्का बसला आहे. शिवछत्रपतींचं अलौकिक कार्य शिवचरित्राद्वारे बाबासाहेबांनी घरोघरी पोहोचवलं. त्यांचं संपूर्ण जीवनच छत्रपतीमय होतं. छत्रपतींमुळंच महाराष्ट्र झाला याची जाणीव त्यांनी आजच्या पिढीला करून दिली,' असं लतादीदींनी म्हटलं आहे. वाचा: 'आम्हा सर्व मंगेशकरांचे बाबासाहेबांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अगदी अलीकडंच माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले होते. या पितृतुल्य व्यक्तित्वाला माझा त्रिवार मुजरा आणि विनम्र श्रद्धांजली,' असं लतादीदींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पुरंदरेंचं योगदान विसरू शकत नाही - शरद पवार 'बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवचरित्राबद्दल शेकडो व्याख्यानं दिली. शिवाजी महाराजांच्या इतिहासासंबंधी आस्था निर्माण करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीत काही वादग्रस्त मुद्देही होते. अर्थात, त्यावर भाष्य करण्याइतका मी जाणकार नाही. हे सगळं असलं तरी त्यांचं काम मोठं होतं. त्यांचं योगदान आपण विसरू शकत नाही,' अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. अजित पवार म्हणतात... 'बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DhSurP

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.