Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्र्यांना ट्वीटचेही स्वातंत्र्य नाही!; रोहित पवार यांनी केला हा मोठा दावा

अहमदनगर : नेत्यांकडून उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (जेवर विमानतळ) फोटो म्हणून चीनमधील बीजिंग डॅक्सिंग इंटरनॅशनल एअरपोर्टचे फोटो शेअर केल्याचे प्रकरण चर्चेत आहे. यावरून काँग्रेसचे आमदार यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांना ट्वीटसुद्धा त्यांच्या मर्जीने करता येत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे. ( ) वाचा: पंतप्रधान यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी जेवर विमानतळाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सुरवात केली. प्रत्यक्षात मात्र हे फोटो चीनमधील विमानतळाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून भाजपवर टीका सुरू झाली आहे. चीनच्या सरकारी टेलिव्हिजन नेटवर्कचे अधिकारी शेन शेवेई यांनीही ट्वीट करून याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. वाचा: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून भाजपवर टीका केली. त्यांनी म्हटले आहे, 'खोटं तर बोलायचंच पण रेटून बोलायचं या महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सवयीचं अनुकरण आधी आणि आता केंद्र सरकारही करतंय. परंतु हे सर्व करत असताना किमान आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन होणार नाही, याची तरी काळजी घ्यायला हवी. सर्वच मंत्री नेहमीच सारखाच फोटो, सारखाच मजकूर ट्वीट करतात. सर्वच मंत्र्यांना स्वतःचे ट्वीट देखील स्वतःच्या मर्जीनुसार करता येत नसतील, ट्वीटर अकाऊंटचेही केंद्रीकरण झाले असेल तर याशिवाय लोकशाहीला दुसरा मोठा धोका काय असू शकतो? फेक न्यूज प्रोपोगंडा, केंद्रीकरण यावरच ज्यांचा पाया आधारलेला आहे, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय असू शकते?, असेही पवार यांनी म्हटले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/316Vh9m

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.