Type Here to Get Search Results !

'आमचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि...'; भुजबळ यांचे महत्त्वाचे विधान

मुंबई: राज्यातील सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने सरकारच्या कामगिरीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यात नेत्यांकडून सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी सरकारच्या स्थैर्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. भुजबळ यांनी भाजपलाही यावेळी लक्ष्य केले. ( ) वाचा: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यावेळी बोलताना भुजबळ यांनी सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ, ईडी चौकशी, शेतकरी आंदोलन, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. वाचा: 'राज्यातील स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी काही लोक अजूनही सरकार पडायचे स्वप्न पाहत आहेत. पण त्यात त्यांना यश येणार नाही. राज्यातील आमचं सरकार पूर्ण पाच वर्ष काम करेलच आणि त्यानंतरही सत्तेवर येईल', असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 'अजूनही माझ्या मागच्या अडचणी सुरू आहेत. त्यांना वाटत हे सगळं केल्यावर ते आमच्याकडे येतील. पण, हे शक्य नाही. मी बदलू शकत नाही' असे नमूद करत भुजबळ यांनी भाजपला लक्ष्य केलं. भाजपचा उल्लेख मात्र भुजबळ यांनी टाळला. इम्पेरिकल डेटावरून केंद्रावर टीका पंतप्रधान सांगतात मी ओबीसी आहे. मग त्यांचं सरकार इम्पेरिकल डाटा का देत नाही? ते गप्प का बसले आहेत, असे प्रश्न भुजबळ यांनी विचारले. गुजरातचे चार सुपुत्र आहेत. दोन विकत आहेत आणि दोन खरेदी करत आहेत. काँग्रेसने काय केले विचारायचे आणि त्यांच्या काळातील सर्व विकायला काढायचे हे यांचे काम आहे, अशी टोलेबाजी कोणाचेही नाव न घेता भुजबळ यांनी केली. आम्ही सुद्धा जनगणना करणार आहोत. परंतु जनगणना पूर्ण होईपर्यंत आमचं आरक्षण सुरू राहिले पाहिजे. याविरोधात भाजपचे लोक कोर्टात जात आहेत. आज गाय- मेंढ्यांची गणना होत आहे. मात्र, आमची होत नाही. आम्हाला आमची संख्या कळली पाहिजे, असे सांगताना आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही, असे भुजबळ म्हणाले. कृषी विधेयकांविरुद्ध शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी मृत्युमुखी पडले. आंदोलन काय असते ते त्यांनी दाखवून दिले आहे. शेवटी सरकारला त्यामुळेच माघार घ्यावी लागली. ही लढ्याची ताकत आहे, असेही भुजबळ म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lg7n6K

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.