Type Here to Get Search Results !

हार्बर मार्गासाठी सर्वात मोठी घोषणा; १ डिसेंबरपासून होणार 'हे' बदल

मुंबई: मध्य रेल्वे १ डिसेंबरपासून , ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर म्हणजेच बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग यासाठी सुधारित उपनगरीय वेळापत्रक लागू करणार असून पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ( ) वाचा: कोविड काळात मुंबई उपनगरीय लोकलसेवेला मोठा फटका बसला होता. मात्र, कोविडची दुसरी लाट ओसरल्यानंतर लोकलसेवा आता पूर्वपदावर आली आहे. त्यामुळेच रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक निर्णय घेण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून करत एसी लोकलचं गिफ्टही या मार्गासाठी देण्यात आलं आहे. हार्बर मार्गावर १ डिसेंबरपासून ही सेवा सुरू होत असून सोमवार ते शुक्रवार दररोज एसी लोकलच्या १२ फेऱ्या होणार आहेत. त्याचवेळी अनेक लोकलसेवांचा विस्तारही करण्यात आला आहे. वाचा: सुधारित वेळापत्रकात नेमकं काय? - हार्बर मार्गावर १२ वातानुकूलित १ डिसेंबरपासून. सध्याच्या १२ सेवा वातानुकूलित सेवांनी बदलल्या जातील. - - अंधेरी सेवा आणि पनवेल -अंधेरी सर्व सेवांचा गोरेगाव स्थानकापर्यंत विस्तार. - सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंधेरी दरम्यान चालणाऱ्या ४४ सेवा गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील (सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोरेगाव दरम्यान ४२ सेवा सुरू आहेत). - सध्या पनवेल आणि अंधेरी दरम्यान चालणाऱ्या १८ सेवा गोरेगावपर्यंत विस्तारित केल्या जातील. - सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान चालणाऱ्या २ सेवा गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील. - गोरेगाव ते/पर्यंत एकूण सेवांची संख्या ४२ वरून १०६ पर्यंत वाढेल. - वांद्रे ते/पर्यंत एकूण सेवांची संख्या ८६ असेल. - हार्बर मार्गावरील एकूण सेवांची संख्या सध्याप्रमाणे ६१४ आणि ट्रान्सहार्बर मार्गावर सध्याप्रमाणे २६२ राहतील आणि मुंबई विभागातील उपनगरीय सेवांची संख्या सध्याप्रमाणे १७७४ राहील. - चौथ्या कॉरिडॉरवरील सकाळच्या पीक अवर्सच्या वेळेत सेवा वाढतील, तथापि एकूण सेवांची संख्या ४० इतकीच राहील. - मानखुर्द पासून सुरू होणारी मूळ सेवा आता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून सुटेल. - ठाणे येथून १०.४० वाजता सुटणारी TBR-1 बेलापूर लोकल आणि ठाणे येथून २३.१४ वाजता सुटणारी TBR-3 बेलापूर लोकल आता पनवेलपर्यंत चालविण्यात येईल. - एसी लोकल सोमवार ते शनिवार चालतील आणि रविवारी/नामांकित सुट्टीच्या दिवशी संबंधित वेळेत सामान्य लोकल धावतील. वाचा: एसी लोकलचे वेळापत्रक: V-4- वाशी येथून ०४.२५ वाजता सुटणारी लोकल. PL-13 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५.१८ वाजता सुटणारी लोकल. PL-24 पनवेल येथून ०६.४५ वाजता सुटणारी लोकल. PL-49 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ८.०८ वाजता सुटणारी लोकल. PL-52 पनवेल येथून ०९.४० वाजता सुटणारी लोकल. PL-79 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०४ वाजता सुटणारी लोकल. PL-78 पनवेल येथून १२.४१ वाजता सुटणारी लोकल. PL-111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १४.१२ वाजता सुटणारी लोकल. PL-116 पनवेल येथून १५.४५ वाजता सुटणारी लोकल. PL-145 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १७.०८ वाजता सुटणारी लोकल. PL-144 पनवेल येथून १८.३७ वाजता सुटणारी लोकल. PL-175 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.०० वाजता सुटणारी लोकल. - सुधारित वेळापत्रक ३० नोव्हेंबरपासून https://ift.tt/2DvUm6l या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. मेन लाइनच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3E1R1Gs

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.