Type Here to Get Search Results !

मलिक-फडणवीस वाद: पटोले यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

मुंबई: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी मंत्री यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर मलिक यांनीही अशाच प्रकारचे आरोप आज केले आहेत. त्यामुळे दोघांमधील तणाव वाढला असून हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याने त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी तर या आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीच मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. ( ) वाचा: गांधी भवन येथे पटोले यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी मलिक-फडणवीस वादाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पटोले यांनी परखड भूमिका मांडली. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना चाललेला आहे. दोन्ही नेते जबाबदार पदावर आहेत. त्यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्ड, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप गंभीर असून याबाबत या दोन्ही नेत्यांनी पुरावे द्यायला हवेत, असे पटोले म्हणाले. फडणवीस व मलिक यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राची बदनामी सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावेत, असे आवाहनही पटोले यांनी केले. वाचा: दरम्यान, मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या या कारवाईवर सर्वप्रथम मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर मलिक यांनी थेट आणि गंभीर आरोप केले. त्यानंतर मलिक हे सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन वानखेडे यांच्यासोबतच भाजपला लक्ष्य करत आहेत. या आरोपांच्या मालिकेत मलिक यांनी ड्रग्ज तस्करीत जेरबंद झालेल्या जयदीप राणाचं नाव घेत फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यानंतर फडणवीस यांनी पलटवार करत मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याला मलिक यांनी आज प्रत्युत्तर दिले असून फडणवीस यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध राहिले आहेत आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक व्यक्तींना संरक्षण दिलं होतं, असं मलिक म्हणाले आहेत. या लढाईने अत्यंत गंभीर असं वळण घेतलं असतानाच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दोघांच्याही आरोपांची चौकशी व्हावी, अशी पटोले यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही यावर स्पष्ट मत मांडलं आहे. सध्या जे आरोप प्रत्यारोप चालले आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत असून हे कुठेतरी थांबायला हवं. यासाठी कुणीतरी महत्त्वाच्या व्यक्तीने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे यात पुढाकार घेऊ शकतात, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n9UAVb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.