Type Here to Get Search Results !

खंडणीचा गुन्हा: परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाने दिला मोठा धक्का

मुंबई: वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. हे त्यांच्याविरुद्धचे आतापर्यंतचे तिसरे वॉरंट ठरले आहे. ( ) वाचा: ठाण्यात परमबीर यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात हजर होत नसल्याने न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. यापूर्वी व ठाणेमधील खंडणी प्रकरणांत न्यायालयांनी परमबीर यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहेत. आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध तीन अटक वॉरंट काढले गेले असून परमबीर यांच्या अडचणी वाढतच चालल्याचे दिसत आहे. दोन अधिकाऱ्यांना झाली आहे अटक मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह एकूण सात अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सीआयडीने पोलीस निरीक्षक आणि यांना सोमवारी अटक केली आहे. कोरके हे सध्या खंडाळा पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये सेवेत आहेत तर कोरके या नायगाव येथील स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमध्ये आहेत. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वाचा: दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबईत आणि ठाण्यात आणखीही खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस त्यांच्या मागावर आहेत मात्र परमबीर अद्याप हाती लागलेले नाहीत. परमबीर हे मुंबईबाहेर आहेत. ते येथून निघाल्यानंतर चंदिगड वा रोहतक येथे होते. तिथून ते नेपाळमार्गे बेल्जियमला गेल्याची शक्यता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली होती. याबाबत अद्याप कोणत्याही यंत्रणेने दुजोरा दिलेला नसला तरी परमबीर यांना हुडकून काढण्यात मात्र यश आलेलं नाही. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31DI8Ey

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.