Type Here to Get Search Results !

अनिल परब व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत; चित्रा वाघ यांचे अजित पवारांना पत्र

मुंबईः मुंबई उच्च न्यायालयाने आदेशाद्वारे मनाई करूनही संप करत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळं एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या (Chitra Wagh)यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांना पत्र लिहलं आहे. () चित्रा वाघ यांनी अजित पवार यांना पत्र लिहित एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढाकार घेऊन त्वरित तोडगा काढावा, अशी विनंती चित्रा वाघ यांनी केलं आहे. चित्र वाघ यांनी ट्विटरवर ते पत्र पोस्ट केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. आपल्याला माहित आहे की, 'गेले ५ दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत,' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. वाचाः 'एसटी विलिनीकऱणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट पुढे केली जातेय. सुमारे ३५ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. त्यांची मुलं पोरकी झालीत. पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरुन येणार...? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का...? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय,' असंही वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे. वाचाः 'दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा,' अशी विनंती चित्रा वाघ यांनी केली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qHyPOk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.