Type Here to Get Search Results !

जळगाव, नांदेडमध्ये गांजा जप्त; क्रांती रेडकर-वानखेडे म्हणते...

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर खंडणीचे आरोप झाल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या व सहा प्रकरणांच्या तपासातून दूर करण्यात आलेले एनसीबीचे अधिकारी (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते () यांनी आरोपाचा मारा सुरूच ठेवला आहे. मलिक यांनी आज वानखेडे यांच्यावर नव्यानं आरोप केला आहे. तर, दुसरीकडं वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री () हिनं नांदेड व जळगावमध्ये एनसीबीनं केलेल्या कारवाईवरून सूचक व खोचक ट्वीट केलं आहे. मुंबई एनसीबीच्या पथकानं जळगाव जिल्ह्यातील एरंडोल इथं कारवाई करून १५०० किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला गेला होता. या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय, नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकानं धडक कारवाई करत ११०० किलो गांजा जप्त केला आहे. यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली आहेत. दोघा संशयित तस्करांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. समीर वानखेडे यांनीच या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर क्रांती रेडकर हिनं ट्वीट केलं आहे. 'ना रुकेंगे, ना थमेंगे...' असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना हा टोला असल्याचं मानलं जात आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण हे खंडणीसाठी घडवून आणण्यात आलं होतं. काही लोकांना अडकवण्यासाठी ठरवून क्रूझवर पार्टी ठेवण्यात आली होती. यामागे वानखेडे हे होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. या प्रकरणातील काही पंच पुढं आल्यानंतर पैशांची देवाणघेवाण झाल्याचंही समोर आलं होतं. केवळ क्रूझ प्रकरणच नव्हे तर एनसीबीनं अशा २६ प्रकरणांत बोगस कारवाया केल्याचाही मलिक यांचा आरोप आहे. वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठीही घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. असं असतानाही मलिक यांनी वानखेडे यांना लक्ष्य करणं सुरूच ठेवलं आहे. हेही वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FlY4tW

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.