Type Here to Get Search Results !

कोविड काळात मध्य रेल्वेने दंडापोटी मोठी वसुली; पाहा, किती कोटी रुपये केले प्राप्त!

मुंबई: मध्य रेल्वेने काळात नियम तोडणाऱ्या प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते ६ नोव्हेंबर या सात महिन्याच्या काळात सुमारे १७ लाख २२ हजार प्रवाशांना आकारला आहे. या दंडापोटी मध्य रेल्वेने तब्बल १०० कोटी ८२ लाख रुपये वसूल केले आहेत. (during the kovid period collected more than rs 100 crore in revenue through fines) या बरोबरच मध्ये रेल्वेच्या विशेष पथकाने कोविडचे नियम न पाळणाऱ्या २९ हजार १९ व्यक्तींना दंड ठोठावला आहे. रेल्वेने अशा प्रकारे वसूल केलेल्या महसुलाचा विभागवार विचार करता भुसावळ विभागाने विक्रमी वसुली केल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागाने एकूण ३३ कोटी ७४ लाख रुपयांची वसुली केली आहे. त्या खालोखाल मुंबई विभागाने ३३ कोटी २० लाख रुपयांची वसुली केली आहे. तसेच नागपूर विभागाने १६ कोटी ७३ लाख, तसेच सोलापूर विभाग, पुणे विभाग आणि मुख्यालयांकडून एकूण १७ कोटी १५ लाख रुपये वसूल केले आहेत. क्लिक करा आणि वाचा- ही वसुली करत असताना रेल्वेने मुंबई विभागातील ६ लाख ८३ हजार लोकांवर कारवाई केली, तर भुसावळ विभागाने ४ लाख ६८ हजार, नागपूर विभागाने २ लाख ५१ हजार, सोलापूर आणि पुणे विभागाने ३ लाख २० हजार जणांवर कारवाई केली. क्लिक करा आणि वाचा- या बरोबरच १ एप्रिल २०२१ ते ६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तिकीट तपासणी करणाऱ्या विशेष पथकाने कोविड नियमांचा भंग करण्याऱ्या एकूण २९ हजार १९ लोकांवर कारवाई केली. यात मास्क किंवा फेस कव्हर न वापरणारे एकूण २३ हजार ८१६ प्रवासी आढळले. यांच्याकडून एकूण ३९ लाख ६८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर कोविड नियमांनुसार प्रवासाची परवानगी नसलेल्या ५ हजार २०३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून २६ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fa2bJo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.