Type Here to Get Search Results !

'शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला'; राज ठाकरेंची पुरंदरेंना श्रद्धांजली

मुंबई: शिवशाहीर (Babasaheb Purandare) यांच्या निधनानंतर समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, राजकीय नेते आणि राजकीय पक्षांनी पुरंदरे यांना अर्पण करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Raj Thackeray) यांनीही पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु ते मला पितृतुल्य होते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Raj Thackeray has paid a humble tribute to Babasaheb Purandare) बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं, असं म्हटलं आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृत्युल्य असल्याचेही ठाकरे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली अर्पण करताना राज ठाकरे यांनी एक आठवण सांगितली आहे. बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची, असे सांगत शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असे राज यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे, अशा शब्दात पुरंदरे यांचा गौरव करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HjPuxs

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.