Type Here to Get Search Results !

धक्कादायक! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज

नुपूर पाटील । एकविसाव्या शतकात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. लष्करातही महिलांना मानाचे स्थान मिळाले आहे. मात्र, समाजात अनेक ठिकाणी अद्यापही पुरुषी मानसिकता कायम आहे. या भयंकर वास्तवाची प्रचिती देणारा धक्कादायक प्रकार पुण्यातील () एका कंपनीत समोर आला आहे. पुण्यात () येथील एका कंपनीत महिलांना अपमानजनक वागणूक दिली जात गेल्याचं समोर आलं आहे. प्रभा इंजिनियरिंग असं कंपनीचं नाव आहे. येथे महिलांना मानसिक त्रास दिला जात होता. स्वच्छतागृहात जायच्या आधी त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला जात होता. त्याचप्रमाणे महिलांना कार्यालयात यायला उशीर झाला तर गेटवर अडवले जात होते. हा सगळा प्रकार मनसेचे माथाडी कामगार नेते निलेश माझीरे यांना कळताच त्यांनी कंपनी गाठली. तेथील महिलांनी त्यांच्यापुढं तक्रारीचा पाढा वाचला. त्यानंतर मनसेनं आपल्या स्टाइलनं कंपनीच्या मॅनेजरला जाब विचारला, तेव्हा त्यानंही या प्रकाराची कबुली दिली. वाचा: याबाबत बोलताना निलेश माझीरे म्हणाले, 'कंपनीतील एका महिलेने कळवले की पाच महिलांना अचानक काढून टाकण्यात आलं आहे. तिनं दिलेल्या माहितीनंतर आम्ही प्रभा कंपनी गाठली असता तिथल्या अनेक गोष्टी आमच्यासमोर आल्या. महिलांनी गैरप्रकाराची तक्रार करायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकारामुळे महिलांचा आत्मसन्मान दुखावला गेला आहे.' कंपनीतील पीडित महिला या प्रकरणाची तक्रार पौड पोलीस ठाण्यात करणार आहेत, अशी माहिती माझीरे यांनी दिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dcIEvH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.