Type Here to Get Search Results !

धक्कादायक! काळाचौकीत सव्वा तीन महिन्यांच्या बालिकेचं अपहरण, परिसरात खळबळ

मुंबई: एका अज्ञात महिलेने एका सव्वा तीन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील काळाचौकी परिसरात घडली आहे. आपल्याया कपडे ठेवण्याचे बास्केट विकायचे आहे असा बहाणा करत या अपहरणकर्त्या महिलेने आपला डाव साधला. या घटनेमुळे काळाचौकी परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (a three and a half month old girl has been abducted by an unknown woman in kalachowki in mumbai) ही धक्कादायक घटना काळाचौकी परिसरातील संघर्ष सदन इमारतीत घडली. हा प्रकार दुपारच्या सुमाराला घडला. ही महिला बास्केट विकण्याच्या बहाण्याने आली होती. जुन्या मोबाईल देऊन बास्केट विकण्याचे काम ती करत होती. संघर्ष इमारतीत येऊन या महिलेने या इमारतीत राहणाऱ्या दीपा (नाव बदलण्यात आलेले आहे) यांच्या खोलीवर गेली. दीपा यांना नवे बास्केट घ्यायचे होते. त्यांच्याकडे एक जुना मोबाईल होता. तो मोबाईल शोधण्यासाठी त्या आतील खोलीत गेल्या. हीच संधी साधत खाटेवर असलेल्या सव्वातीन महिन्याच्या बालिकेला त्या अज्ञात महिलेने उचलले आणि ती पसार झाली. क्लिक करा आणि वाचा- दीपा या परत आल्याचे पाहून बास्केटवाली महिला तिथे नसल्याचे तिच्या लक्षात आले. मात्र, अचानक तिने खाटेकडे पाहिल्यानंतर तिला मोठा धक्काच बसला. तिची चिमुकली खाटेवर नव्हती. हे पाहून दीपा याना प्रचंड धक्का बसला. आपल्या चिमुकलीला त्या बास्केटवाल्या महिलेनेचे पळवल्याची त्यांना खात्री झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी या अज्ञात महिलेविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात अपरहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस बालिकेचा आणि या अज्ञात महिलेचा शोध घेत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o9PZ5N

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.