Type Here to Get Search Results !

अनिल देशमुखांच्या मागचे शुक्लकाष्ट संपेना; आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबईः मनी लाँडरिंग प्रकरणात दोन नोव्हेंबरपासून अटकेत असलेले माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीये. अनिल देशमुखांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ६ नोव्हेंबरला ईडी कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीने दुसऱ्याच दिवशी त्याला तातडीच्या याचिकेद्वारे आव्हान दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना पुन्हा १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले. त्यानंतर देशमुख यांची अधिक चौकशी करता यावी यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाचाः दरम्यान, देशमुख यांनी कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंटमालकांकडून १०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले, असा आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशीअंती एफआयआर नोंदवला. त्याआधारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११ मे रोजी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्या प्रकरणी २ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुखांना ईडीकडून मध्यरात्री अटक करण्यात आली होती. वाचाः ईडीचे आरोप काय? गैरमार्गाने कमावलेले कोट्यवधी रुपये वळते करून घेण्यासाठी अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांनी ‘मेसर्स अटलांटिक व्हिस्टा रिअल इस्टेट्स’, ‘काँक्रीट एंटरप्रायझेस’ यांसह २७ कंपन्यांचा वापर केला, या सर्व कंपन्यांवर देशमुख कुटुंबीयांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण, असा संशय ईडीला आहे. तसंच, सचिन वाझेच्या माध्यमातून देशमुख यांनी बार मालकांकडून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान चार कोटी ७० लाख रुपये मिळवले, सर्व पैसे ‘नंबर-१’साठी म्हणजेच अनिल देशमुख यांच्यासाठी होते, असे वाझेकडून जबाबात उघड झाल्याचं ईडीचा दावा आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/324dDIj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.