Type Here to Get Search Results !

स्वाभिमानीचं कापूस सोयाबीन आंदोलन तूर्तास स्थगित, रविकांत तुपकरांची मोठी घोषणा

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या आज अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस होता. फडणवीसांनी त्यांना सांगितले. पालकमंत्री डॉ. शिंगणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तुपकरांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. यावेळी रविकांत तुपकर भावुक होत त्यांना अश्रू अनावर झाले होते. प्रसारमाध्यमांनी या लढ्याला दिलेल्या बळाबद्दल आभार मानले तर राजू शेट्टींनी दिवसातून अनेक वेळा माझ्या तब्येतीची चौकशी केल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यकर्तेही रडले. डॉ. शिंगणे यांनी तुपकरांना शरबत पाजून अन्नत्याग सोडवला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशा प्रकारे चार दिवस सुरू असलेल्या स्वाभिमानीच्या आंदोलनाचा समारोप झाला. पालकमंत्र्यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तुपकरांच्या मागण्यांबद्दल २० मिनिटे चर्चा केली. त्यातून २४ नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक लावण्याचा निर्णय झाला आहे. तुपकरांना या बैठकीचे निमंत्रण तातडीने द्या, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार पत्र घेऊनही पालकमंत्री सकाळी साडेनऊच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यांनी तुपकरांना उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन अन्नत्याग मागे घेण्याबद्दल विनंती केली. कोणतीही सोयापेंड देशात आयात करणार नाही, असा शब्द केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांना दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी तुपकरांना दिली. नागपुरात तुपकरांनी आंदोलन सुरू केले होते. मात्र, नागपूर पोलिसांनी त्‍यांना अटक करून बुलडाण्यात आले. १८ नोव्‍हेंबरपासून बुलडाण्यात आंदोलन सुरू होते. आंदोलन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपासून उपाशी असल्याने तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली होती. आज त्‍यांच्‍या अन्‍नत्‍यागाचा चौथा दिवस असल्याने तब्‍येत जास्तच खराब होण्याची शक्‍यता होती. तुपकरांची प्रकृती खालावत असताना गावागावात सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. काल शेख रफीक या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळून घेण्याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यांना रोखण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांचा संताप अनावर होऊन त्‍यांनी चिखली रस्ता रोखला होता. काल १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या घराजवळ चिखली मार्गावर रस्ता अडवून पोलीस वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी रविकांत तुपकर त्यांची पत्नी एडवोकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्यासह इतर २० ते २५ कार्यकर्त्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात रात्री गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z4g24r

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.