Type Here to Get Search Results !

'राज्यात एक मुख्यमंत्री आहे, पण...'; ठाकरे सरकारवर फडणवीस बरसले

मुंबई: 'आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आहे पण त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आहे आणि यात जनतेचे मात्र हाल होत आहेत', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर निशाणा साधला. ( ) वाचा: भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत होत आहे. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत ठाकरे सरकारला लक्ष्य केले. राज्यात सरकारचे सध्या अस्तित्वच दिसत नसून जनतेच्या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. सरकारमध्ये हजारो कोटींची लूट चालली असताना शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र काहीच आलेले नसून या सरकारविरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावेच लागेल, असे आवाहन फडणवीस यांनी केले. वाचा: महाराष्ट्रातलं आतापर्यंतचं हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. सध्या येथे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय ते द्या' या पद्धतीने राज्य चालवले जात आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही, असे फडणवीस म्हणाले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण चालले आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध उघड झाले आहेत. अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी राजरोस सुरू आहे. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती, असा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही, त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. वाचा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्री आणि नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच मंत्री आणि फडणवीस यांच्यात अंडरवर्ल्ड कनेक्शनवरून एकमेकांवर आरोप केले गेले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कुणाचेही थेट नाव न घेता सूचक शब्दांत महाविकास आघाडीवर तोफ डागली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qIMzZ9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.