Type Here to Get Search Results !

भाई जगताप यांच्यावर काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप; थेट सोनियांकडे तक्रार

मुंबई: काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनजागरण पदयात्रेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार यांच्यात खटके उडाल्यानंतर सिद्दीकी यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांच्याकडे तक्रार केली असून जगताप यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सिद्दीकी यांचे जगताप यांच्याविरुद्धचे हे दुसरे पत्र असून यानिमित्ताने पुन्हा एकदा आला आहे. ( ) वाचा: मुंबई काँग्रेसच्या कार्यक्रमांत डावललं जातं ही झिशान सिद्दीकी यांची आधीपासूनच तक्रार आहे. त्यातच १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत काँग्रेसने जनगजागरण पदयात्रा काढली होती. वाढती महागाई आणि बरोजगारीच्या विरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी ही पदयात्रा होती. या पदयात्रेत झिशान सिद्दीकी आणि भाई जगताप यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत झिशान सिद्दीकी यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून त्यात जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाचा: पदयात्रेवेळी प्रमुख दहा नेते येथे गेले होते. यावेळी झिशान सिद्दीकी यांना अडवण्यात आले असता मोठा वाद उभा राहिला होता. हाच घटनाक्रम सिद्दीकी यांनी तक्रारीत नमूद केला आहे. भाई जगताप यांनी मला धक्काबुक्की केली. माझ्या धर्माबद्दलही त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. शेकडो कार्यकर्त्यांसमोरच त्यांनी मला अपमानित केले. तेव्हा केवळ पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मी गप्प राहिलो, असे सिद्दीकी यांनी म्हटले आहे. वाचा: राजगृह येथे जाण्यापासून मला भाई जगताप यांनी रोखले. 'एमएलए विमेले जो भी कोई हो बाहर आऊट', असे शब्द त्यांनी मला वापरले. भाई, तुम्ही आमचे अध्यक्ष आहात. तुम्ही अशाप्रकारे मला अपमानित करू शकत नाही, असे मी त्यांना म्हटले असता 'हां जो करना है कर, तेरेको अच्छा नहीं लग रहा है तो...' असे म्हणत त्यांनी मला अपशब्द वापरला असा आरोप झिशान यांनी केला आहे. भाई जगताप यांचे हे वागणे धक्कादायक आणि पक्षाची प्रतिमा मलिन करणारे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती झिशान यांनी पत्रात केली आहे. याआधीही झिशान यांनी जगताप यांच्याविरुद्ध सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे येत्या काळात जगताप विरुद्ध सिद्दीकी हा वाद चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/327KRGI

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.