Type Here to Get Search Results !

'मराठी मते मिळणार नाहीत म्हणून...'; फडणवीसांचा शिवसेनेवर मोठा आरोप

मुंबई: निवडणुका जिंकण्यासाठी व्होटबँकेचे राजकारण खेळत आहे, असा थेट आरोप आज विरोधी पक्षनेते यांनी केला. यावेळी दिवंगत यांचे नाव घेत त्यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वाला लक्ष्य केले. ( ) वाचा: भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आज देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. यावेळी फडणवीस यांच्या निशाण्यावर शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री होते. त्यांचा नामोल्लेख टाळत फडणवीस यांनी टीकेचे बाण सोडले. 'आपले जुने मित्र' असा उल्लेख करत फडणवीस यांनी शिवसेनेच्या बदलत्या राजकारणाचा समाचार घेतला. वाचा: आपले जुने मित्र स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणायचे पण तेच आता अजान स्पर्धा घेताना दिसत आहेत. उर्दूमध्ये कॅलेंडर काढून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे करून टाकलं आहे. त्यांच्यातला हा अचानक घडलेला बदल त्यांनाच लखलाभ ठरो, असे नमूद करत फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. आमच्या जुन्या मित्रांचा डोळा आता मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे. मुंबई त्यांना परत जिंकायची आहे पण कसं जिंकणार, हा प्रश्न त्यांना पडला आहे. मुंबईत त्यांना अमराठी मते मिळणार नाहीत. मराठी मतदारही त्यांना आता मते देणार नाहीत मग राहते एकच व्होटबँक ती म्हणजे मुस्लिम व्होटबँक. त्यावर डोळा ठेवून सगळं काही चाललं आहे. त्यात अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना साथ आहेच, असे नमूद करत फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. वाचा: भाजप हा सर्वसमावेशक राजकारण करणारा पक्ष आहे. जात, धर्म, पंथ याच्यापलीकडे जाऊन 'सबका साथ सबका विकास' हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिला आहे. असं असलं तरी मतांसाठी आम्ही कुणाचे लांगूलचालन करणार नाही हे लक्षात ठेवा. भले आम्ही निवडणुका हरू पण व्होटबँकेचे राजकारण कधीही आमच्याकडून होणार नाही. देशविरोधी ताकदींशी भाजप कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी करू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dms1ZX

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.