Type Here to Get Search Results !

ओमिक्रॉनचा धोका; मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, लॉकडाऊनबाबत म्हणाले...

मुंबई: आफ्रिकन देशांमध्ये वेगाने पसरत असलेल्या करोनाच्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेत सर्वच राज्यांना सतर्क केलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आज एक तातडीची उच्चस्तरिय बैठक घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली व महत्त्वाचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिथूनच त्यांनी ही बैठक घेतली. दरम्यान, पाहता उद्या राज्य मंत्रिमंडळाचीही बैठक घेऊन मुख्यमंत्री पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ( ) वाचा: विषाणूचा ओमिक्रॉन हा नवा प्रकार चारपट वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळेच धास्तावले आहेत. त्यातही आफ्रिकन देश तसेच ज्या अन्य देशांत या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत तिथून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या संदर्भात महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत दक्षता बाळगण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व संबंधितांची एक बैठकही काल घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी उच्चस्तरिय बैठक घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राज्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वाचा: मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेतला व त्यानंतर प्रशासनाला निर्देश दिले. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची गरज असून त्यात कोणतीही ढिलाई चालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले. लॉकडाऊनबाबतही मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले व नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D1UC67

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.