Type Here to Get Search Results !

'समजत नाही अशी मंडळी बोलतात', शरद पवारांच्या त्या वक्तव्यावरुन फडणवीसांचा निशाणा

मुंबईः देशात पेट्रोल- डिझेलच्या (Petrol- Disel Price) वाढत्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, दिवाळीच्या आधीच केंद्रानं इंधन दरात कपात करत नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनी पेट्रोल डीझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय राज्यात कधी होणार? असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ()यांना केला होता. त्यावेळी शरद पवारांनी केंद्राकडे बोट दाखवलं होतं. पवारांच्या या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांनी () निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना इंधन दराबाबत भाष्य केलं. तसंच, जीएसटीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. राज्यातील लोकांनी इंधन दरवाढीबाबत दिलासा मिळू शकतो का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर पवारांनी राज्य सरकार निश्चित दिलासा देईल, असं म्हटलं होतं. तसंच, केंद्र सरकारने जीएसटीचे देणे आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल, असा टोला पवारांनी लगावला होता. वाचाः शरद पवारांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेच आहे. गेल्या वर्षीही मिळाली, या वर्षीही मिळणार आहे. ती कुठेच जात नाही. पण केंद्राने ५ रुपये कर कमी केला की आपोआप ७ रुपये टॅक्स कमी होतो. आमचं म्हणणंय तो १०- १२ रुपये करा ना, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/304n2yJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.