मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी बारामती दौऱ्यावर गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी बारामतीचं कौतुक करताना विरोधकांवर हल्ला चढवला होता. फटाके वाजवा पण धूर सोडू नका, असं ते म्हणाले होते. हाच धागा पकडत आज केंद्रीय मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात, असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावला आहे. नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दादरा नगर हवेली पोटनिवडणूक व इतर विषयांवरुन त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय फटाके वाजवा पण धूर सोडून नका आणि आवाजही करु नका. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात. असाच एक फटाका बारामतीला सोडण्यात आलाय त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता. फक्त वास होता. त्यामुळं महाराष्ट्रात प्रदूषण झालं, असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे. वाचाः तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेची नारायण राणेंनी आठवण करुन दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका करताना वापरलेली विधाने नारायण राणेंनी पत्रकारांसमोर वाचून दाखवली आहे. प्रमुखांनी गद्दारीने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केले नव्हते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली होती. याची आठवण करुन देताना शिवसेना प्रमुखांनी नाही तर त्यांच्या पुत्राने भाजपच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री पद मिळाले. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज सगळीकडे धिंदवडे निघत आहेत, असा टोमणा राणेंनी मारला आहे. मुख्यमंत्री बारामतीला गेले तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तरी बोलायचे. एसटी कर्मचाऱ्याचा संप आहे. राज्याची अवस्था काय आहे. त्यावर काही बोलत नाही. बारामतीचे कौतुक करतायेत ते मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3k80MLs