मुंबई : मुंबईत एका व्यक्तीने ट्रेनमध्ये चढण्यास थांबवल्यामुळे दोघांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तो पहिल्या डब्यात शिरला तेव्हा त्याला सहप्रवाशांनी अडवले, यावर त्याने रागाच्या भरात फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश शंकर गौडा याने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, त्याचा ट्रेनमध्ये काही प्रवाशांशी वाद झाला, तो चुकून पहिल्या श्रेणीच्या डब्यात चढला, काही प्रवाशांनी त्याच्याशी गैरवर्तन केले, शिवीगाळ केली. त्याला ड्रग्ज अॅडिक्ट म्हटलं. त्यामुळे त्याला भायखळा स्टेशनवर उतरावे लागले. यावेळी रागाने गौडा याने या घटनेचा राग फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तींवर काढला आणि त्यांची हत्या केली. दक्षिण मुंबईत १५ मिनिटांत दोन जणांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सुरेश शंकर गौडा याला पोलिसांनी अटक केली आहे. ४० वर्षीय आरोपी गौडा याने रागाच्या भरात हा गुन्हा केल्याचे चौकशीत पोलिसांना सांगितले. ट्रेनमधील काही लोकांमुळे त्याला भायखळा स्टेशनवर उतरावे लागले. भायखळा आणि जेजे मार्ग दरम्यान बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून आम्ही गौडाच्या हालचाली पाहिल्या, असे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो बदलापूर-सीएसटी गाडीतून खाली उतरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौडा याने २३ ऑक्टोबर रोजी भायखळा फ्रूट मार्केट आणि जेजे मार्गाच्या फूटपाथवर दोन अज्ञात व्यक्तींची हत्या केली होती. त्याने पहिला खून भायखळा येथे सायंकाळी ७.५० वाजता केला, तर दुसरा खून रात्री ८.०५ वाजता केला. खरंतर, गौडाही फूटपाथवर राहतो. गौडा हा कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले असून, तो २१ वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. आधी ऑटोरिक्षा चालवायचा. गौडा याला २००३ मध्ये एका प्रवाशाला लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Yh2MsP