Type Here to Get Search Results !

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए; मोदींच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीची जबरदस्त प्रतिक्रिया

मुंबई: देशातील शेतकऱ्यांकडून प्रखर विरोध झालेल्या व एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनापुढं नमतं घेऊन अखेर केंद्र सरकारनं नवे कृषी कायदे अखेर मागे घेतले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज ही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. 'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे. (NCP on ) राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. 'आजचा दिवस देशाच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे. देशातील शेतकऱ्यांचा आणि लोकशाहीचा मोठा विजय झाला आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 'केंद्रानं आणलेले कृषी कायदे अन्यायकारक व जाचक होते, ते मागे घेतले जावेत अशी सुरुवातीपासूनचीच आमची भूमिका होती. मात्र, 'हम करे सो कायदा' असा मोदी सरकारचा अविर्भाव होता. हा अविर्भाव शेतकऱ्यांनी एकजुटीनं मोडून काढला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात अनेक अडथळे आणले गेले. त्यांना खलिस्तानी, देशद्रोही, दहशतवादी ठरवण्यात आलं. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आजवर १०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पण ते मागे हटले नाहीत. अखेर मोदी सरकारला झुकावं लागलं. सात वर्षात पहिल्यांदाच अशा प्रकारे सरकारनं एखादा निर्णय मागे घेतला आहे. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे,' असं मलिक म्हणाले. वाचा: 'उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होतेय. निवडणुकीच्या निमित्तानं का होईना, हा निर्णय झाला हे महत्त्वाचं आहे. अर्थात, दोन्ही राज्यांत भाजप हरणारच आहे याची आम्हाला खात्री आहे, असंही मलिक म्हणाले. 'मोदी सरकारची मनमानी आता चालणार नाही हा संदेश शेतकऱ्यांच्या लढ्यानं देशाला दिला आहे. यापुढं देखील देशात काही चुकीचं घडत असेल तर त्या विरोधात ठामपणे उभं राहा, विजय निश्चित आहे, असं आवाहन मलिक यांनी जनतेला केलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dx5f1V

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.