Type Here to Get Search Results !

नवं वादळ! समीर वानखेडे यांच्या नावानं नवी मुंबईत बार अँड रेस्टॉरण्ट

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक (Sameer Wankhede) यांच्यावर खंडणीखोरी व नोकरी मिळवण्यासाठी बनावट जातप्रमाणपत्र बनवल्याचा आरोप असतानाच, आता त्यांच्या नावावर बार अँड रेस्टॉरण्टचा परवाना असल्याचं समोर आलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं हे वृत्त दिलं आहे. नवी मुंबईतील वाशी इथं हे बार आहे. अबकारी खात्याच्या रेकॉर्डनुसार, हॉटेल सद्गुरूचा (Sadguru Hotel) परवाना वानखेडे यांच्या नावावर आहे. २७ ऑक्टोबर १९९७ साली हा परवाना देण्यात आला होता आणि नियमानुसार त्याचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. हा परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. या हॉटेलात विदेशी मद्य व भारतीय बनावटीचं मद्य विकण्याची मुभा आहे. बारचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर असून भारत सरकारच्या सेवेत आल्यापासून त्यांनी आपले वडील यांना मुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) दिलं आहे. वाचा: समीर वानखेडे यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना यास दुजोरा दिला आहे. 'माझ्या नावावर बारचा परवाना असणं यात बेकायदेशीर काहीही नाही. २००६ साली सरकारी सेवेत येतानाच मी जी स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे, त्यात हे नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, या व्यवसायातून येणारा सर्व नफा इन्कम टॅक्स रिटर्नमध्येही दाखवला जातो,' असं त्यांनी म्हटलं आहे. यांनी साधली संधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी 'टाइम्स'ची ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि 'समीर दाऊद वानखेडे यांचा आणखी एक फर्जीवाडा' अशा शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32gfytn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.