Type Here to Get Search Results !

तूर पिकावर किडीचा हल्ला?, कृषी शास्त्रज्ञांनी सांगितला 'हा' रामबाण उपाय

अमरावती : यंदा राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला याच पार्श्वभूमीवर वातावरणातील बदलामुळे पिकांना अनेक रोगांना तोंड द्यावे लागत आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत तूर पिकावर काही ठिकाणी मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मारुका (Maruca vetrata) ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्यारंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करून त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खाते. तिस-या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळीशेंगांच्या झुपक्यात किंवा मातीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसात पूर्ण होतो. यंदा चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे व हे पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. शेतकर्‍यांनी तूर पिकापसून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील पंधरवडयातील असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील मारुका अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला मारुका अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. किडीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकची फवारणी करावी. १. नोवलुरोन ५.२५ इंडोक्झाकार्ब ४.५० एससी १६ मिली २. थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू.पी २० ग्रॅम किंवा ३. फ्लूबेंडामाइड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसर-या फवारणीच्या वेळेस किटकनाशकाची मात्र तिप्पट करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसर-या फवारणीच्या वेळेस किटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये. सादर किटकनाशकांच्या शिफारशी या तदर्थ स्वरुपाच्या असून शेतकरी बंधूंना तात्काळ नियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या असे आव्हान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31DkKHi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.