Type Here to Get Search Results !

'नोटबंदीनंतर फडणवीसांच्या आशीर्वादानं राज्यात बनावट नोटांचं रॅकेट सुरू होतं'

मुंबई: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नोटबंदी केल्यानंतर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये १४ कोटींच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. मात्र, (Devendra Fadnavis) यांनी हे प्रकरण दाबलं, असं सांगतानाच, फडणवीसांच्या आशीर्वादानं त्यावेळी (Fake Note Racket) सुरू होतं, असा खळबळजनक आरोप यांनी आज केला. वाचा: मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्यात आलं. अनेक कुख्यात गुंडांना सरकारी पदं देण्यात आली होती, असा आरोप करतानाच, मलिक यांनी बनावट नोटांच्या एका प्रकरणाचा हवालाही दिला. '८ नोव्हेंबर २०१६ ला देशात नोटबंदी झाली. काळा पैसा नष्ट करण्यासाठी, बनावट नोटा संपवण्यासाठी व दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं सांगितलं गेलं. या निर्णयानंतर देशभर बनावट नोटा पकडल्या जाऊ लागल्या. मुंबईत ८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसीतील एक छापा पडला. त्या १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मात्र, हे प्रकरण फडणवीसांनी दाबलं. शेवटी ८ लाख ८० हजार रुपयांच्या नोटा पकडल्याचं सांगून प्रकरण निकाली काढण्यात आलं,' अशी माहिती मलिक यांनी दिली. वाचा: '८ ऑक्टोबरच्या प्रकरणात मुंबई व पुण्यात अटका झाल्या. इमरान आलम शेख, रियाझ शेख आणि नवी मुंबईतही एकाला अटक झाली. पण त्यांना लगेचच जामीन मिळाला. पाकिस्तानात छापण्यात आलेल्या बनावट नोटा भारतात मिळतात. गुन्हा दाखल होतो, पण लगेच जामीन मिळतो. हे प्रकरण 'एनआयए'कडं दिलं जात नाही. हे सगळं का झालं? कारण, या सगळ्याला भाजपचं आणि देवेंद्र फडणवीसांचं संरक्षण होतं,' असा थेट आरोप मलिक यांनी केला. याच प्रकरणात अटक झालेल्या इमरान आलम शेख याचा भाऊ हाजी अराफत शेख याला फडणवीसांनी भाजपमध्ये आणलं. त्याला अल्पसंख्याक आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं, याकडंही मलिक यांनी लक्ष वेधलं. या सर्व प्रकरणांची माहिती मी राज्याच्या गृहविभागाला देणार आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही मलिक यांनी व्यक्त केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n8FoHT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.