Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग; पोलिस नोंदवणार पोपटराव पवार यांचाही जबाब

अहमदनगरः जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीचे सुरवातीपासूनचे साक्षीदार, आदर्शगाव संकल्प व कार्यान्वयन समितीचे कार्याध्यक्ष पोपटाराव पवार () यांचाही जबाब पोलिस नोंदवून घेणार आहेत. तपास अधिकारी डीवायएसपी संदीप मिटके यांनी याला दुजोरा दिला. पुढील आठवड्यात पवार यांना पोलिस ठाण्यात बोलवण्याची शक्यता आहे. () जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला आग लागली होती. त्यामध्ये आतापर्यंत बारा जणांचा बळी गेला आहे. ही आग लागली तेव्हा पवार तेथे उपस्थित होते. त्यांनीच अधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क केला. आग अटोक्यात आणण्याच्या प्रत्यक्ष कामातही त्यांनी मदत केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना यासंबंधी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे आगीच्या घटनेचे सुरवातीचे प्रमुख साक्षीदार म्हणून पवार यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे. आग प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये चौघांना अटकही झाली आहे. आग लागल्यानंतर रुग्णांचे जीव वाचविण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी स्वत: फिर्याद देत डॉक्टर आणि परिचारिकांविरूद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या देखरेखाली डीवायएसपी मिटके तपास करीत आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यावरून घटनाक्रम जुळविण्याचे आणि नेमके दोषी ठरविण्याचे काम सुरू आहे. यातून पोलिसांना महत्वपूर्ण माहिती आणि पुरावेही मिळत आहेत. आता याच प्रकरणात पवार यांचाही जबाब पोलिस नोंदविणार आहेत. वाचाः पवार यांना दिल्लीत पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी जायचे होते. त्यासाठी करोना चाचणी आवश्यक असल्याने ती करून घेण्यासाठी ते शनिवारी, ६ नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात आले होते. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आणि त्यानंतरही विविध मुलाखतींमधून पवार यांनी या घटनेचा उहापोह केला आहे. त्यांनी दिलेली माहिती तापासात उपयोगी पडेल, म्हणून पोलिसांनी त्यांचाही जबाब नोंदवून घेण्याचे ठरविले आहे. त्यांच्यासोबतच त्यांना फोनवरून घटनेची माहिती देणारे त्यांचे चालक आणि अन्य व्यकींचाही जबाब नोंदविला जाऊ शकतो. या घटनेची माहिती देताना पवार यांनी सांगितले होते, 'त्या दिवशी चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात आलो होतो. जिल्हा शल्यचिकित्सकांची टीम तेथे होती. तेथे मी चाचणी करून घेतली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी नवीन ऑपरेशन थिएटर पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार ते पाहण्यासाठी गेलो. तेथे बसून आमची चर्चा सुरू होती. त्यावेळी माझी गाडी करोना अतिदक्षता विभागाच्या जवळ उभी होती. काही वेळात माझ्या चालकाचा फोन आला की अतिदक्षता विभागाच्या खिडकीतून धूर येत आहे. त्यावर लगेच मी आणि सोबत असलेले डॉ. घुगे तिकडे गेलो. तेवढ्यात मला दुसरा फोन आला. त्यांनी आग लागल्याचे सांगितले. आम्ही धावतच तेथे पोहचलो. अतिदक्षता विभागातून धुराचे लोट येत होते. दरवाजा बंद होता, तो उघडण्याचे प्रयत्न सुरू होते. तेवढ्यात अग्निशमन दलाची गाडी आली. त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारी नव्हते. त्यामुळे त्यांनी बोलाविल्याने मी स्वत: व माझा चालक त्यांच्या मदतीला गेलो. तोपर्यंत दार उघडले गेले. या गडबडीत डॉ. घुगे यांच्या हाताला जखम झाली होती. तेथे रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. तो अद्याप माझ्या कानात घुमतो आहे,' असे पवार यांनी प्रसार माध्यमांना मुलाखतींमधून सांगितले आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस त्यांचा अधिकृत जबाब नोंदवून घेणार आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qOC3Qf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.