Type Here to Get Search Results !

हिंगोली: कळमनुरीत दोन गटात तुफान राडा; भररस्त्यात एकमेकांवर उगारल्या तलवारी

हिंगोली: हिंगोलीच्या कळमनुरी शहरात सोमवारी रात्री १०.३०च्या सुमारास दोन गटात तलवारीने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही गटातील एकूण पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. हिंगोल शहरात सोमवारी रात्री काही काळ तणावाचे वातावरण होते. काही अज्ञात गुंड शहरात तलवारी घेऊन रस्त्यावर फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. तसंच, गावठी कट्टयाने हवेत गोळीबार देखील करण्यात आल्यानं एकच खबळब उडाली आहे. वाचाः परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी कळमनुरी पोलिस स्थानकात परपस्परांविरोधात एकूण ४७ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत कळमनुरी शहरात सद्या तणावपूर्ण शांतता आहे. वाचाः जखमींवर कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील नवीन बस स्थानक परिसरात हा प्रकार घडलाय. एक रिक्षा व एका चारचाकी वाहनांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. हल्लेखोरांपैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सद्या कळमनुरी शहरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. फिर्यादी हत्यार सिंग टाक, व अब्राज खान, अफरोज खान पठाण या दोघा फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपींची नावे वाढण्याची शक्यता आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FDkN4H

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.