Type Here to Get Search Results !

दिवाळीच्या दिवशीच बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न, बीडमध्ये खळबळ

बीड : राज्यात अनेक दिवसांपासून राज्य परिवहन मंत्रिमंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. वेतनवाढ, बोनस अशा अनेक प्रश्नांवर त्यांचा संप सुरू होता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यातल्या एसटी बस पुन्हा एकदा थांबल्या आहेत. संघटना विरहित स्वयंघोषित संपामुळे जिल्ह्यातल्या एकही आगारातून बसेस सुटल्या नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणाला प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यातच एक धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. आष्टी तालुक्यातल्या कडाळ इथल्या बसस्थानकामध्ये एका बस चालकाने विष प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा राज्य परिवहन मंडळ हादरलं आहे. खरंतर, गुरुवारी बीड जिल्ह्यामध्ये अचानक बस कर्मचाऱ्यांनी संप केला. त्यामुळे दिवाळीच्या सणाची लगबग सुरू असतानाच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी उपोषण करत ठिय्या आंदोलनदेखील करण्यात आले. हेच आंदोलन सुरू असताना बसवरील चालक बाळू महादेव कदम यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत बसचालकास रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांचा थोडक्यात जीव बचावला. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे बीडमध्ये सध्या खळबळ उडाली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wgKsga

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.