Type Here to Get Search Results !

कोंबडा, डोमकावळा आणि गरुड...; फडणवीस नेमकं कुणाला काय म्हणाले?

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि काँग्रेसचे प्रवक्ते हे गेल्या काही दिवसांपासून दररोज पत्रकार परिषदा घेऊन ड्रग्ज प्रकरणांबाबत गौप्यस्फोट करत आहेत. त्यातच मलिक यांनी विरोधी पक्षनेते यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. मलिक यांच्यावर तेव्हाच पलटवार करणाऱ्या फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा मलिक यांचे नाव न घेता बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला. ( ) वाचा: बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. फडणवीस यांनी फ्रान्समधील कोंबड्याचा दाखला देत निशाणा साधला. 'काही लोक हल्ली सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्हीवर दिसतात. या लोकांना फार किंमत देण्याची गरज नाही. फ्रान्समध्ये असाच एक मॉरिस नावाचा कोंबडा फेमस झाला होता. तो रोज सकाळी जोरात आरवायचा. त्याचं सुरुवातीला कौतुक झालं पण काही दिवसांनी हा कोंबडा दुपारीही ओरडू लागला. ते मात्र तापदायक होतं. मग काही लोकांना याच फेमस कोंबड्याविरुद्ध कोर्टात जावं लागलं, असे उदाहरण देत फडणवीस यांनी मलिक यांच्यावर तीरकस बाण सोडले. वाचा: फडणवीस यांनी पुढे गरुड आणि कावळ्याचे उदाहरणही दिले. गरुडाच्या पाठीवर कावळा बसतो आणि चोच मारत राहतो. मात्र, गरुड दोन्ही पंख पसरून जेव्हा उंच आकाशात भरारी घेतो तेव्हा त्या उंचीवर कावळ्याला श्वास घेणेही मुश्कील होते आणि कावळा गरुडाच्या पाठीवरून खाली कोसळतो हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. गरुडासारखाच भाजप हा पक्ष असून असे कितीही डोमकावळे मानेवर बसले तरी आपण पंख पसरले की कुणाचा थारा लागू शकत नाही. या सगळ्या डोमकावळ्यांना आपण पुरून उरू, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस मुंबईतील घराबाबत म्हणाले... आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. त्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे सांगत फडणवीस यांनी भष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी साद घातली. 'मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो पण या मुंबईत माझं स्वत:चं घर नव्हतं. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर, वर्षातून बाहेर पडल्यानंतर मला चार महिने रेंटच्या घरात राहावं लागलं. त्यानंतर जेव्हा सरकारी घर मिळालं तेव्हा तिथे राहायला गेलो. त्यामुळे कुणी काहीही म्हणत असले तरी ते आपलं काहीही करू शकणार नाहीत. जे आरोप करतात तेच भ्रष्ट लोक आहेत आणि भ्रष्टाचाराविरुद्ध थेट लढाई ही आपल्याला लढावीच लागेल. जर आपण ही लढाई लढलो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही. ही जनतेची आणि महाराष्ट्राची लढाई आहे', असेही फडणवीस पुढे म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qFHpNB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.