Type Here to Get Search Results !

'NCBने आम्हाला घाबरवण्यासाठी...'; नवाब मलिक यांनी केला थेट आरोप

मुंबई: यांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी मागणारा अर्ज एनसीबीने एनडीपीएस कोर्टात केला आहे. हे सगळं काही मला आणि माझ्या कुटुंबीयांना घाबरवण्यासाठी केले जात आहे, मात्र तुम्ही काहीही करा आम्ही घाबरणार नाही, अशा शब्दांत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी एनसीबीवर निशाणा साधला. ( ) वाचा: समीर खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता करत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची नव्याने पडताळणी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणातील एक आरोपी याला एसआयटीने समन्स बजावले होते. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी सजनानी याने एसआयटीसमोर हजेरी लावली होती. एनसीबीला याच प्रकरणात आरोप असलेल्या समीर खान, सजनानी व अन्य एका व्यक्तीचे आवाजाचे नमुने घ्यायचे असून त्यासाठी एनडीपीएस कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. या घडामोडींवर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वाचा: समीर खान प्रकरणाच्या माध्यमातून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. समीर खान यांचा जामीन रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समीर खान यांना साडेआठ महिने कोठडीत ठेवले. त्यांचा मोबाइल, लॅपटॉप एनसीबीने जप्त केलेला होता. त्यादरम्यान, आवाजाचे नमुने घ्यावे असे त्यांना वाटले नाही आणि आता त्यांना आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत, असे नमूद करत एनसीबीच्या तपासावर मलिक यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणात जे काही जप्त करण्यात आले होते त्याची सँपल गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासली गेली. त्यात केवळ सात ग्रॅम सोडून बाकी ड्रग्ज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना पुन्हा सँपल तपासण्याची मागणी केली गेली आहे. गुजरातमधील ही लॅब नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उभारण्यात आलेली आहे. या लॅबच्या रिपोर्टवरही एनसीबीचा विश्वास नाही का?, असा सवाल मलिक यांनी केला. बहुतेक प्रकरणात फॉरेन्सिक अहवालावर जो आरोपी आहे त्याचे आक्षेप असतात येथे मात्र उलट घडत आहे. तपास यंत्रणाच अहवालावर आक्षेप घेत आहे, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले. वाचा: एनसीबी एसआयटीने तीन प्रकरणांचा तपास थांबवला आहे. प्रकरण, समीर खानशी संबंधित प्रकरण आणि अरमान कोहली ड्रग्ज प्रकरण अशा तीनच प्रकरणांत एसआयटी तपास करणार आहे. नवाब मलिक यांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले. एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या धाडसत्रांशी संबंधित २६ प्रकरणे बोगस आहेत. त्या सर्वच प्रकरणांत एसआयटीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. असे असताना ६ प्रकरणांमधली तीन प्रकरणे एसआयटीने सोडली असतील तर त्यामागचे कारण स्पष्ट झाले पाहिजे, असे मलिक म्हणाले. उरलेल्या तीन प्रकरणांत आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा दावा केला जात असल्याबद्दलही मलिक यांनी आक्षेप नोंदवला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qJkbpU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.