Type Here to Get Search Results !

'हा' मंत्री खुर्चीवरच झोपतो की काय?; भाजप खासदाराची जोरदार फटकेबाजी

अहमदनगर : ‘सध्या दररोज सकाळी टीव्ही सुरू केला की एक मंत्री दिसतो. तो झोपायला जातो की खुर्चीवरच झोपतो, हेसुद्धा कळत नाही. कारण आपण रात्री टीव्ही पाहून झोपायला जाण्यापूर्वी तो खुर्चीवरच असतो पुन्हा सकाळी टीव्ही लावला तरीही तो खुर्चीवरच दिसतो. महाराष्ट्रातील सात-आठ लोकांना टीव्हीवर येण्यासाठी बंदी केली पाहिजे, आता यासाठी मीच कोर्टात जातो, अशी जोरदार टोलेबाजी खासदार डॉ. यांनी केली आहे. सुजय विखे यांनी मंत्र्याचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख अल्पसंख्याक विभागाचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट होते. ( ) वाचा: पाथर्डी येथे माधवराव निऱ्हाळी नाट्यगृह व लोकनेते गोपनाथ मुंडे जॉगिंग पार्क या विकासकामाचे लोकार्पण आज सायंकाळी भाजप नेत्या यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. विखे यांनी जोरदार फटकेबाजी केली. आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते. मंत्री मलिक यांचा नामोल्लेख टाळत विखे यांनी टीका केली. डॉ. विखे म्हणाले, 'स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री टीव्हीवर रान उठवत आहेत. सध्या जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री टीव्हीवर येत आहेत, ते त्यांनी किती अल्पसंख्याकांना रोजगार दिला, अल्पसंख्याक बांधवासाठी कोणती योजना राबवली, यावर भाष्य करीत नाहीत. फटाका, बॉम्ब फोडण्याच्या घोषणा करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा बॉम्ब त्यांनी फोडावा. या मंत्र्याला शेतीतील उत्पन्नाबाबत काही माहिती नाही, पण गांजा किती रुपयांना मिळतो, हे माहिती आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी छापा मारला तर कांदा, सोयाबिन, तूर सापडेल. मात्र, यांच्या घरी छापा मारला तर गांजा सापडतो', अशी टीका विखे यांनी केली. वाचा: महाराष्ट्रातील सात-आठ लोकांना टीव्हीवर येण्यासाठी बंदी केली पाहिजे. कारण या लोकांना पाहून घरामध्ये भांडणे होत आहेत. आता मीच यासाठी न्यायालयात याचिका करण्याच्या विचारात आहे, असे सुजय विखे म्हणाले. डॉ. विखे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत दर आठवड्याला नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एक तरी मंत्री येतो. ज्यांच्यावर महाराष्ट्र व देशाची जबाबदारी आहे, तेही नगरला एका महिन्यात तिसऱ्यांदा आले. हे नेते नगर जिल्ह्यात आले, पण ते त्या कामाची उद्घाटने करण्यासाठी आले, ज्यामध्ये त्यांचे एक रुपयाचे सुद्धा योगदान नाही. महाविकास आघाडी सरकारने मागच्या वर्षभरात केलेली सर्व भूमीपूजनं ही मागील भाजप सरकार काळात झालेली आहेत. पण जे स्वतः केले नाही, त्याचे श्रेय हे लोक घेत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D9NSDR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.