Type Here to Get Search Results !

'फडणवीसांनी माझं तिकीट कापलं आणि...'; 'या' नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेसने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. यावेळी पाटील यांनी भाजपवर निशाणा साधल्यानंतर तोडसाम यांनीही थेट यांना लक्ष्य केलं. ( Former Bjp Mla ) वाचा: राज्यात सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. या धामधुमीत राष्ट्रवादीने यवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का देत माजी आमदार राजू तोडसाम यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले केले. तोडसाम यांनी आजच राष्ट्रवादीत प्रवेश केला. जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरू नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे ही आमच्यासाठी मोठी बाब आहे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. राजू तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये जुन्या नेत्यांना डावलले जात आहे. त्यातूनच तोडसाम यांच्यासारखा नेता आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहे, याचा आनंद वाटतोय, असेही जयंत पाटील म्हणाले. वाचा: राजू तोडसाम यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'मी भाजपमध्ये १० वर्षे काम केले. सर्वांना सोबत घेऊन चालत राहिलो. मला २०१४ साली आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सत्ताधारी पक्षात काम करत असलो तरी विधानसभेत जयंत पाटील यांचे भाषण आवर्जून ऐकायचो. विरोधकांनाही मी मानसन्मान देत होतो. तसेच आदिवासींच्या प्रश्नावर वारंवार आवाज उठवत असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी माझे तिकीट २०१९ च्या निवडणुकीत कापले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांनी मला बोलावून पक्षात थांबायला सांगितले. मात्र मी राष्ट्रवादीतच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजप सोडत असताना माझ्या मागे ईडी लागेल याची मला चिंता नाही. मी आदिवासी माणूस असून माझ्याकडे काहीच नाही. चौकशी केली तरी काही सापडणार नाही', असे तोडसाम म्हणाले. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री , माजी आमदार संदीप बाजोरिया, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c3GpKQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.