Type Here to Get Search Results !

ठाण्यात उच्चशिक्षित महिला चोर अटकेत; तपासात धक्कादायक माहिती उघड

ठाणे: दुकानातून करणाऱ्या एका उच्चशिक्षित महिलेला पोलिसांनी अटक केले आहे. या महिलेकडून २ लाख ६५ हजारांच्या विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महिलेची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून तिला पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. त्याचबरोबर कॉल डीटेल रेकॉर्ड काढून ६०० पेक्षाही अधिक महिलांच्या मोबाइल क्रमांकांची पडताळणी केली आणि या महिलेचा क्रमांक प्राप्त करत पोलिसांनी तिला जेरबंद केले. ( ) वाचा: निमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफर देण्यात आल्याने ठाणे कापुरबावडी येथील एका नामांकित दुकानात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत एका महिलेने दुकानातून एक लाख रुपये किमतीच्या लॅपटॉपची चोरी केली. ३ नोव्हेंबरचा हा प्रकार असून या प्रकरणी १२ दिवसांनी ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर एक महिला लॅपटॉप चोरून घेऊन जाताना दिसून आले. तिच्या बोलण्यावरुन आणि पेहरावावरुन ही महिला उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारी असल्याचा पोलिसांना संशय आला. मात्र तिचा शोध घेणे सोपे नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढले. पोलिसांना मिळालेल्या हजारो मोबाइल क्रमांकामधून महिला चोराचा मोबाइल क्रमांक शोधणे हे जिकरीचे काम होते. तरीही पोलिसांनी तपास करत या क्रमांकांपैकी ६१० महिलांच्या मोबाइल क्रमांकाची पडताळणी सुरू केली आणि संशयित मोबाइल क्रमांकांशी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून आणखीन माहिती प्राप्त केली. अशाप्रकारे पोलिसांनी लॅपटॉप चोरणाऱ्या महिलेचा मोबाइल क्रमांक शोधून काढला आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेजसह इतरही ११ ठिकाणच्या फुटेजची केलेली पाहणी, सोशल मिडीयावरील फोटो आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी महिला चोरास शोधून काढले. या महिलेला मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. वाचा: महिलेच्या घराची झडती घेण्यात आली. यामध्ये तिच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळालेल्या आहेत. महिलेकडून लॅपटॉपसह मोबाइल, पेन ड्राइव्ह, हार्डडिस्क आदी वस्तू जप्त केल्याचे राठोड यांनी सांगितले. विशेषकरून ही महिला वेगवेगळ्या मोठ्या दुकानांमध्ये जाऊन इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची चोरी करीत होती व या महिलेची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे राठोड यांनी सांगितले. गृहिणी असलेल्या या महिलेचा पती कंपनीमध्ये काम करत असून तिला मुलेही आहेत. परंतु चोरी करण्यामागचा तिचा उद्देश काय होता याची चौकशी करण्यात येत असल्याचे राठोड यांनी सांगितले. एमकॉमपर्यंत शिक्षण झाले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी सांगितले. ही महिला उच्चभ्रू वस्तीमध्ये राहत असून तिच्या बोलण्यावरून आणि पेहरावावरून तिच्यावर कोणी संशयही घेत नसे, अशी माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kH66p1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.