Type Here to Get Search Results !

रामदास कदम लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'माझ्याविरोधात...'

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत असलेले नेते आज माध्यमांसमोर आले. शिवसेनाप्रमुख दिवंगत यांच्या स्मृतिदिनानिमित्त कदम यांनी आज शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला व महत्त्वाची माहिती दिली. ( ) वाचा: रामदास कदम यांच्या संभाषणाच्या कथित क्लिप व्हायरल झाल्या होत्या. रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या व्यक्तीच्या माध्यमातून परिवहन मंत्री तसेच मिलिंद नार्वेकर यांच्या अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती भाजप नेते यांना पुरवल्याचा दावा त्याआधारे करण्यात आला होता. मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी या क्लिप सादर करताना अनेक दावे केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांना आज विचारणा करण्यात आली असता त्यांनी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. वाचा: 'मी पत्रकार परिषद घेणार आहे आणि अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे. मी माझी बाजू मांडणार असून त्यात अनेक गौप्यस्फोटही असतील. आज मी बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी येथे आलो आहे. आज हा विषय नको', असे कदम म्हणाले. माझ्याविरोधातील बातम्या कुठून येतात, कोणाचा हा कट आहे, हे मला माहीत नाही पण मी कडवा शिवसैनिक आहे. भगव्या झेंड्याचा शिपाई आहे आणि मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, इतकंच मी सांगेन, असे कदम यांनी सांगितले. रामदास कदम यांनी यावेळी बाळासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठी माणूस आज ताठ मानेने जगतोय ते केवळ आणि केवळ बाळासाहेबांमुळेच, असे सांगताना आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनीच मोठे केले, असे कदम म्हणाले. वाचा: दरम्यान, रामदास कदम यांच्या कथित क्लिप व्हायरल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पक्षविरोधी कारवाया केल्याने कदम यांच्यावर पक्षनेतृत्वाकडून कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. त्याचवेळी रामदास कदम हे भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर कदम यांनी आज माध्यमांशी साधलेला संवाद महत्त्वाचा ठरला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32c35a7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.