Type Here to Get Search Results !

भुजबळ बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक; 'ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी...'

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी विनम्र अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सारेजण कटिबद्ध असल्याचे सांगितले. ( ) छगन भुजबळ यांनी आज पंकज भुजबळ यांच्यासह स्मृतीस्थळी येत बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केले. त्यानंतर नमस्कार करत व जय महाराष्ट्र म्हणतच भुजबळ यांनी माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. 'बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होण्यासाठी मी आज येथे आलो होतो. साहेबांना वंदन केल्यानंतर थोडावेळ यांच्या शेजारी बसलो तर जुन्या आठवणी निघाल्या. पंत म्हणाले, आपण साहेबांचे उजवे डावे हात होतो. त्यावर मी म्हणालो, आपण आहोत तोपर्यंत एकत्र पुढे जाऊ. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा गाडा आम्ही सगळेच चांगल्या रितीने ओढत आहोत. पुढे नेत आहोत. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सारेच कटिबद्ध आहोत', असे मी त्यांना म्हणाल्याचे भुजबळ यांनी सांगितले. वाचा: तेजस्वी नेतृत्व छगन भुजबळ यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनही बाळासाहेबांना अभिवादन केले. 'मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन!', अशा भावना यात भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. वाचा: ...आणि ठाकरे-भुजबळ यांच्यातील दुरावा संपला छगन भुजबळ हे एकेकाळी बाळासाहेबांचे विश्वासू शिलेदार होते. नंतरच्या काळात अनेक कारणांनी या नात्यात कटुता आली. भुजबळ यांनी वेगळा राजकीय मार्ग निवडला आणि नंतर टोकाचे वैरही पाहायला मिळाले. मात्र बाळासाहेब हयात असतानाच ठाकरे आणि भुजबळ यांच्यातील हा दुरावा संपुष्टात आला. त्यानंतर भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा मधल्या काळात रंगल्या होत्या. पण तसं काही घडलं नाही. असं असलं तरी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आपसूकच ठाकरे व भुजबळ यांच्यातील जवळीक वाढली आहे. त्यातच मुख्यमंत्री यांच्या कार्यशैलीचे नेहमीच भुजबळ यांच्याकडून कौतुक होताना पाहायला मिळते. हाच जिव्हाळा आज भुजबळ यांच्या प्रतिक्रियेतून जाणवला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YTf8rp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.