Type Here to Get Search Results !

फडणवीस-अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोप: हा रियाझ भाटी आहे तरी कोण?

मुंबई: अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांचा अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांशी थेट संबंध असल्याचा आरोप केला आहे. हे आरोप करताना मलिक यांनी याचे नाव घेतले असून त्यावरून मोठं वादळ उठलं आहे. भाटी याचे नेत्यांसह सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबतही फोटो आहेत, असे समोर आले असून गंभीर स्वरूपाचे रेकॉर्ड असूनही हा भाटी दिग्गज नेत्यांच्या आसपास कसा वावरत होता, हा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. ( ) वाचा: रियाझ भाटी हा एक कुख्यात गुंड आहे आणि त्याचे अंडरवर्ल्ड डॉन याच्याशी थेट कनेक्शन असल्याची माहिती उघड झालेली आहे. भाटीवर खंडणी वसुली, भूखंड हडपणे, फसवणूक, गोळीबार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जुलै महिन्यात गोरेगावमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात भाटी हा सहआरोपी आहे. वाझे याच्या सांगण्यावरूनच रियाझ भाटी हा बार आणि रेस्टॉरंट्स मालकांकडून वसुली करायचा आणि ती रक्कम वाझेपर्यंत पोहचवायचा, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणात त्याचा अटकपूर्व जामीन सप्टेंबर महिन्यात रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले मात्र अद्याप भाटी हाती लागलेला नाही. वाचा: रियाझ भाटी हा फेब्रुवारी २०२० मध्ये सौदी आरेबियामध्ये पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र मुंबई विमानतळावरच त्याला रोखण्यात आले होते. जामिनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला रोखले गेले होते. त्याआधी २०१५ मध्ये विमानतळावरच त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेत जाण्याच्या बेतात होता. तेव्हाच त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. गंभीर बाब म्हणजे २०१३ मध्येही त्याने असाच प्रयत्न केला होता. बनावट पासपोर्टच्या आधारे पसार होण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली गेली होती. मुंबईतील मालाड येथे भूखंड हडपल्याने आणि धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर २००६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाऊद टोळीशी असलेल्या कनेक्शनचा वापर करून त्याने बळजबरीने जमिनीवर कब्जा केला होता. खंडाळा येथे रियाझ भाटी याच्याविरुद्ध गोळीबार व धमकी प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oeAGrg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.