Type Here to Get Search Results !

'दोन-चार मंत्र्यांना तुरुंगात टाकलं तरी...'; जयंत पाटलांचं मोठं विधान

मुंबई: 'दोन-चार मंत्र्यांना मुद्दाम बदनाम करून तुरुंगात टाकलात तर बाकीचे आमदार आहेतच की... आमच्याकडे कशाचीही कमी नाही. तुम्ही किती जणांना बदनाम करणार? किती लोकांना आत टाकणार?', असे प्रश्न विचारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी आज भाजपवर सडकून टीका केली. ( ) वाचा: ऐनकेन प्रकारे राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे सरकार लवकर जावं ही भाजपची इच्छा आहे मात्र देशाच्या घटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करतोय त्यामुळे सरकार बरखास्त करायचा अधिकार कुणाला नाही. शिवाय चारचौघांची इच्छा असली तरी सरकार बरखास्त होवू शकत नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. विधानसभेत जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत सरकार जाणं शक्य नाही, असे सांगतानाच ईडीची धाड पडणं हे आता नित्याचंच झालं आहे. राज्यातील जनतेला भाजपच्या या खेळाची सवय झाल्याने याचं विशेष अप्रूप वाटत नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला. महाराष्ट्रात आहे म्हणून भाजपकडून येथे सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे मात्र त्यांचं सरकार असतं तर एकदाही छापेमारी झाली नसती, असा दावाही पाटील यांनी केला. वाचा: नवाब मलिक यांना आमचा संपूर्ण पाठिंबा मंत्री नवाब मलिक यांनी ज्या गोष्टी समोर आणल्या आहेत त्या धक्कादायक असून त्याबाबत एनसीबीने शहानिशा करायला हवी. खोटं प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यक्तीने सरकारी नोकरी मिळवली आहे. या सगळ्याचा शहानिशा एनसीबीने करावी अशी आमची मागणी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. नवाब मलिक हे सातत्याने आवाज उठवत असल्याने शेवटी एनसीबीला केस दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात द्यावी लागली. नवाब मलिक यांनी जे आंदोलन उभारले आहे त्या सर्वाला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे जयंत पाटील यांनी आज जाहीर केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HgLspr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.