Type Here to Get Search Results !

एसटी संप का चिघळला? जयंत पाटलांनी भाजपवर केला 'हा' गंभीर आरोप

मुंबई: कर्मचारी आमचेच आहेत. सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत. दंगा करत आहेत. अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी सांगितले. ( Jayant Patil On ) वाचा: परिवहन मंत्री हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजपने ही मर्यादा ओलांडली आहे. ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही असे दिसल्यावर भाजप नेते स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात होत असलेली घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाही समाचार जयंत पाटील यांनी घेतला. वाचा: दरम्यान, एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं. २८ ऑक्टोबर रोजी जाहीर वाढीव महागाई भत्ता मान्य करत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने उपोषण मागं घेतलं होतं. मात्र, २९ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. संघर्ष एसटी युनियन आणि कनिष्ठ वेतन श्रेणी दोन संघटनांनी संपाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यानंतर हा संप चिघळतच चालला आहे. सध्या राज्यातील २५० आगारांतील सेवा ठप्प आहे. उच्च न्यायालयाचा मनाई आदेशही कामगारांनी धुडकावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्य परिवहन मंडळाने विनवणी करूनही कर्मचारी माघार घ्यायला तयार नाहीत. त्यातच भाजपने या कर्मचाऱ्यांना उघड पाठिंबा दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे आंदोलनात उतरले आहेत. त्यावरूनच जंयत पाटील यांनी निशाणा साधला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c5Zb4f

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.