Type Here to Get Search Results !

दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात येणाऱ्या विमानांवर बंदी घाला; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

जालना: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा () एकही रुग्ण अद्याप भारतात आढळून आलेला नाही. मात्र व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक बंद करावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केल्याची माहिती आरोग्यमंत्री () यांनी आज येथे दिली. करोनाच्या नव्या व्हेरिएंटला अटकाव करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार पूर्ण काळजी घेत आहे. सध्या विमानतळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मॉनिटरिंग होत असून स्वाइप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू आहे. विमान प्रवासासाठी ७२ तास आधीच करोना टेस्टिंग प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. विमानतळावर कडक तपासणी केलं जातं असून कवारंटाईन करण्याचा नियम करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या पत्रासह एक विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आलेलं आहे. केंद्रानं अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा टोपे यांनी यावेळी व्यक्त केली. शाळा सुरू करण्याबाबत फेरविचार? येत्या १ डिसेंबरपासून राज्यांतील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबत उद्या आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक होणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही टोपे म्हणाले. राज्यात लसीकरण वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई लोकल पूर्ण क्षमतेनं कधी सुरू होणार? लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाइन असून ती पूर्ण क्षमतेनं सुरू व्हावी अशी लोकांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. मुंबईत आता दिवसाला जेमतेम २०० च्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर जवळपास १०० टक्के लसीकरण देखील झालेलं आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या माहितीवरून योग्य तो निर्णय घेतील, असं टोपे यांनी सांगितलं. हेही वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CVTUr2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.