Type Here to Get Search Results !

किरीट सोमय्यांचा नवा बॉम्ब; शिवसेनेच्या 'या' नेत्यावर केला खळबळजनक आरोप

मुंबई: महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इतर इमारतीसाठी १०० एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप सोमय्या यांनी केला आहे. खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या हा नवा आरोप केला आहे. (bjp leader made serious allegations on shiv sena leader ) किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्जुन खोतकर यांच्यावर हा गंभीर आरोप करत असताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित १०० एकर शासकीय जागा हडपण्याचा घोटाळा सुरू आहे, असे स्फोटक विधानही त्यांनी केले. खोतकरांना मॉल तयार करायचा असून कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इमारतीसाठी त्यांना ही जागा हवी असल्याचा त्यांचा आरोप आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारने साखर कारखान्यासाठी दिलेल्या त्या जागेची किंमत ४०० कोटी रुपये असल्याचे सोमय्या म्हणाले. ही जागा एकूण २४० एकर असल्याची माहिती त्यांनी दिली. या संपूर्ण जागेची किंमत तब्बल १ हजार कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी ईडीने योग्य पद्धतीने तपास सुरू केला असून खोतकर यांची आयकर विभागालाही तक्रार करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. आयकर विभाग खोतकर यांच्या बेनामी व्यवहाराचा तपास करणार असल्याचे सांगतानाच आता मुळे, तपाडीया परिवार आणि सहआयुक्त नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपालीताई यांचेही नावही पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- भावना गवळी यांनी ईडीपुढे हजर राहावे- सोमय्या आता भावना गवळी यांनी ईडीपुढे हजर व्हायला हवे असे सांगतानाच ईडीने भावना गवळी त्यांच्या घोटाळ्याबाबत दाखल केलेल्या आरोपपत्रातमध्ये दोन लोकांची नावे आहेत असे ते म्हणाले. सईद खान आणि भावना गवळी यांच्या आईच्या नावे तब्बल ६९ कोटी रुपयांची प्रॉपर्टी दाखवण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी सईद खान सध्या अटकेत असून भावना गवळी यांच्या आईचे नावही आरोपपत्रात आहे याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे. ही माहिती देतानाच भावना गवळी यांनी केलेल्या घोटाळ्याची शिक्षा त्यांनी त्यांच्या आईला देऊ नये, असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3E1vGNf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.