Type Here to Get Search Results !

करोनाच्या नव्या स्ट्रेनची चिंता; मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय

मुंबईः दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या करोनाच्या नव्या आणि सर्वाधिक धोकादायक वेरियंटने संपूर्ण जगभरात चिंता निर्माण केली आहे. एककीडे करोना रुग्णांच्या संख्या अटोक्यात असल्यानं काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, करोनाच्या या नव्या स्ट्रेननं आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई महानगर पालिकेनं ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. () दक्षिण आफ्रिकेत या आठवड्यात प्रथमच करोनाचा नवीन समोर आला. त्यानंतर हा प्रकार बोस्टवानासह जवळपासच्या इतर अनेक देशांमध्ये पसरला आहे. काही देशांनी दक्षिण अफ्रिकेशी वाहतूकीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळं भारतातही दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या वाहतूकीवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. वाचाः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करावं, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रवाशांची चाचणी केल्यानंतर आलेले नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. वाचाः किती धोकादायक आहे ओमिक्रॉन? करोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन हा नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणू आहे. हा विषाणू खूपच धोकादायक आहे आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. इस्रायलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने करोना लसीच्या दोन्ही डोससह तिसरा बूस्टर डोस देण्यात आला होता. करोनाचा हा नवीन विषाणू डेल्टासह इतर कोणत्याही प्रकारांपेक्षा अतिशय वेगाने पसरतो, असे शास्त्रज्ञांच्या तपासातून समोर आले आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EdEn7v

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.