Type Here to Get Search Results !

अनिल देशमुख, अडसूळ प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची यवतमाळला बदली

मुंबईः मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ()राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे सातभाई यांनी हाताळली होती. () उच्च न्यायालयाचे महानिबंधक एम. डब्लू. चांदवानी यांची स्वाक्षरी असलेला बदलीचा आदेश मंगळवारी प्राप्त झाला आहे. एच. एस. सातभाई यांची यवतमाळ येथील केळापूर येथील बदली करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने तेथील कार्यभार स्वीकारावा, असेही उच्च न्यायालयाने त्यांच्या बदलीच्या आदेशात म्हटलं आहे. वाचाः खासदार व आमदारांविरोधातील फौजदारी खटल्यांच्या सुनावणीची विशेष जबाबदारी एच.एस. सातभाई यांच्यावर होती. ते प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग अॅक्ट या विशेष कोर्टाचं कामकाज राहत होते. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची प्रकरणं न्यायप्रविष्ट होती. मात्र, अचानक झालेल्या त्यांच्या बदलीमुळं अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. वाचाः एच.एस. सातभाई यांच्याकडे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोठडी, शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा अटकपूर्व जामीन व एकनाथ खडसे यांचं भोसरी प्रकरण सुनावणीसाठी होतं. तर, सातभाई यांनीच महाराष्ट्र सदन प्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, चमणकर कुटुंबीय आणि अन्य आरोपींना पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wUdoLc

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.