Type Here to Get Search Results !

मलिक यांच्या निशाण्यावर कंगना; 'ओवरडोस' शब्द वापरत म्हणाले...

मुंबई: कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा यांचा अपमान करणारी अभिनेत्री हिला दिलेला पद्मश्री सन्मान केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करून तिला अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी केली आहे. ( ) वाचा: 'भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले' असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. यावर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली व कंगनावर जोरदार शब्दांत हल्ला केला. १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यसैनिकांचं इतकं मोठं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री काहीही बडबड करत सुटली आहे. मलाना क्रीमचा ओवरडोस झाल्याने बहुदा ती बडबडत असावी, असा टोला हाणतानाच स्वातंत्र्यलढ्याचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशाराच मलिक यांनी दिला. वाचा: दरम्यान, कंगना राणावत हिच्या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कंगनाच्या वक्तव्याचा शिवसेना नेते, खासदार यांनीही खरपूस समाचार घेतला आहे. कंगनाला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार लगेच काढून घेतले पाहिजेत व तिच्या वक्तव्याबाबत भाजपाध्यक्ष तसेच देशाचे पंतप्रधान यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मग हा ताम्रपट भिकाऱ्यांना दिला गेला आहे का?, फासावर गेलेल्या क्रांतीकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवलं आहे का?, असे अनेक प्रश्न आता उभे ठाकले असून याचं उत्तर दिलं जात नसेल तर भाजपच्या सरकारला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा कोणताही अधिकार नसेल, असे राऊत यांनी ठणकावले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qyw6XA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.