Type Here to Get Search Results !

नगर शहराला हादरवून टाकणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले, पण अजूनही...

विजयसिंह होलम । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला () आज मंगळवारी (३० नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. या खटल्यात ११ जणांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे. मात्र त्यावरील सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. मुख्य आरोपी पत्रकार याच्यासह ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया झाल्यावर या खून खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होईल. या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बाळ बोठे यांनी अनुक्रमे जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केले आहेत. त्यावरील सुनावणीही प्रलंबित आहे. ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात जरे यांची हत्या झाली. त्यांच्या कारला अडवून दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोघांनी त्यांच्याशी वाद घालत असताना धारदार चाकूने त्यांचा गळा चिरून हत्या केली. सुरवातीला हे प्रकरण रस्त्यात झालेल्या वादावादीची असल्याचे समोर आले होते. मात्र, वाद सुरू असताना जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो मोबाईलमध्ये काढला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अवघ्या दोन दिवसातच ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) पाच आरोपींना अटक झाली. त्यांच्या चौकशीतून जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तीन डिसेंबरला जाहीर केले. त्यानंतर मात्र बोठे फरार झाल्याने त्याचा शोध राज्यात व देशभरात घेण्यात आला. वाचा: तब्बल १०२ दिवसांनंतर १२ मार्च २०२१ रोजी बोठे याला हैदराबाद येथे अटक झाली. त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणार्‍या आरोपींना अटक झाली. जरे यांच्या खून प्रकरणात एकूण ११ आरोपी असून, यात प्रत्यक्ष खुनात सहा व फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणारे पाच जण आहेत. डिसेंबरच्या मध्यावर आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया होऊ शकते. त्यानंतर खटल्याची नियमित सुनावणी होईल. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. यादव पाटील काम पाहत आहेत. तर फिर्यादी जरे कुटुंबातर्फंही स्वतंत्र वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाचा: जरे यांच्या हत्येनंतर बोठे विरोधात विनयभंग व खंडणीचे असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. तो फरार असतानाच्या काळात त्याचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्याच्या संपत्तीची चौकशी करावी व अन्य मागण्यांसाठी पोलिसांसह राज्य सरकारला निवेदनेही पाठविण्यात आली होती. याशिवाय दोन्हा बाजूंनी विविध तक्रारी होत राहिल्याने प्रकरण गाजत राहिले. मुख्य आरोपी बोठे याचा जामीनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. तेथे येत्या २ डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. आणखी एक आरोपी भिंगारदिवे याच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी बाकी आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3I48W1E

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.