Type Here to Get Search Results !

'मंत्र्याच्या ड्रायव्हरला ४०-४५ हजार पगार मिळतो, एसटी ड्रायव्हरला का मिळू नये?'

उद्धव गोडसे । करोना काळात थकलेल्या वीज बिलांची वसुली करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून सध्या विशेष वसुली मोहीम सुरू आहे. वीज बिल न भरल्यास कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जात आहे. याविरोधात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री () यांनी नाराजी दर्शवली आहे. महिनाभरापासून संपावर असलेल्या एसटी कामगारांच्या मागण्यांनाही त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आज एका कार्यक्रमानिमित्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 'विद्युत विभाग सध्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. वीज बिलांच्या वसुलीसाठी कनेक्शन तोडणे योग्य नाही. शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज दिली जाते, तर मग वीज बिलात ५० टक्के सवलत का मिळू नये? या मागणीसाठी मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर पुन्हा रुजू व्हावे, असे आवाहन करत त्यांच्या मागण्यांचे समर्थनही मंत्री बच्चू कडू यांनी केले. जिल्हाधिकारी, मंत्री यांच्या गाडीवरील चालकाला ४० ते ४५ हजार रुपये पगार मिळतो, तर मग शेकडो कष्टकऱ्यांच्या प्रवासाची सोय करणाऱ्या एसटी चालकालाही चांगला पगार मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाचा: केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्याच्या मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर टीकाही केली. केंद्र सरकारला कृषी धोरण समजत नाही, त्यामुळे देशात कृषी मालाचे दर स्थिर नसतात, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. केंद्राचे कृषी विषयक धोरण बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय शिक्षणविषयक कायद्यातही बदलांची आवश्यकता मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. सध्याचे शिक्षण कायदे संस्थाचालकांच्या बाजूचे आहेत. त्यात बदल करून ते पालकांच्या बाजूचे करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FYEvIb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.